श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात आज शुक्रवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या ठिकाणी दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, यातील दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.
सोपोरमधील मलगनिपोरा येथे हे दहशतवादी लपले आहेत. जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. चकमकीदरम्यान एक जवानदेखील जखमी झाला आहे.
दरम्यान, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते दोघे लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे पोलिसांनी सांगितले. काही दहशतवादी त्या भागात लपून बसल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळपासूनच जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दोघे ठार झाल्यानंतरही संध्याकाळपर्यंत चकमक सुरू होती.