शिंदखेडा । भारतीय जैन संघटनेने आपत्तीग्रस्त क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे भूकंप ,अतीवृष्टी, महापूर ,शेतकरी आत्महत्या , कुपोषण अश्या विविध क्षेत्रात काम करत असते. या आपत्तीग्रस्त भागातील मुलाची शिक्षणाची जबाबदारी ही संघटना करत असते. भारतीय जैन संघटनेचे काम हे सर्व सामान्यसाठी असते. संघटनेचा पदाधिकारी आपल्या पदरचे पैसे खर्च करून काम करत असतो. यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांना सर्व समाजाकडून सहकार्य मिळायला हवे असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले नंदुरबार येथील डीएसके हॉटेलच्या हॉलला खान्देश विभागीय कार्यकारणीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ सदस्य डॉ.कांतीलाल टाटिया , जेष्ठ सदश्य हरकचंद बोरा (धुळे ), कांतीलाल श्रीश्रीमाळ (पाचोरा), विभागीय अध्यक्ष दिलीप कांकरिया यांच्यासह जैन समाजातील बांधव आदी उपस्थित होते
खान्देश विभागीय कार्यकारणीचा पदग्रहण
यावेळी अध्यक्षिय भाषणात आ.रघुवंशींनी सांगितले कीं, मी जैन संघटनेचे काम दोन पिढी पासून पाहत आहे. खान्देशात भारतीय जैन संघटनेची खरी ओळख सुरेशदादा जैन यांनी करून दिली आहे. या संघटनेचे कार्य सुंदर आहे. नंदुरबार जिल्ह्यातून संघटनेला कोणतेही मदत करण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे आश्वासन दिले. यावेळी विभागीय कार्यकरणीची घोषणा करून पदग्रहण सोहळ्यात शपथ घेण्यात आली. यात विभागीय अध्यक्ष दिलीपकुमार कांकरिया ( नंदुरबार) , तर सचिव चंद्रकांत डागा (शिंदखेडा ), सदस्य निर्मल कांकरिया (नंदुरबार ), कमल कोटडीया (नंदुरबार ), रवींद्र कोठारी (नंदुरबार ), मोहनलाल ओस्तवाल ( नंदुरबार ), अनिल शहा (नंदुरबार), दिलीप भटेवरा (धुळे), किशोर सिंगवी (फागणा ), मनोज पारख (धुळे ), पुष्पक ओस्तवाल (धुळे), तुषार बाफना (धुळे), ललित छाजेड (शहादा ),भरत ओस्तवाल (शहादा), अशोक कोटडिया (अक्कलकुआ ), संजय पारख (शिंदखेडा ), राजेंद्रकुमार पारख ( शिरपूर ), कांतीलाल कटारिया (जळगाव), लतीश जैन (चोपडा) , रमणलाल बागरेचा (मुक्ताईनगर), संजय चोपडा ( जामनेर), पियुष संचेती (पाचोरा ) आदींची निवड दोन वर्षासाठी करण्यात आली. या निवडीची खान्देशातून कौतुक होत आहे .आभार चंद्रकांत डागा यांनी केले.