लंडन । आयसीसी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक मॅन ऑफ दि मॅच जिकण्याचा मान युवराज सिंहने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाक विरोधातील सामन्यात मिळविला. हा पुरस्कार मिळताच युवराज सिंग हा दुसरा भारतीय फलंदाज झाला आहे.ज्याने आयसीसी क्रिेकेटच्या सामन्यात सर्वाधिक पारतोषिक जिकले आहे. भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफि सामन्यातील पहिल्या सामना हा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान या संघाबरोबर होता. 2009 नंतर भारताने आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पाकिस्तान विरूध्द खेळतांना त्यांना विजय मिळू दिलेला नाही. ती परंपरा रविवारी झालेल्या सामन्यात कायम ठेवला.या सामन्यात युवराज सिंग याने आपल्या कॅन्सर वर विजय मिळवित क्रिेकेट संघात पुनरागमन करित पहिल्याच सामन्यात आतिषबाजी सारखी फलंदाजी करित मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर केला.
युवराजने आयसीसी टूर्नामेन्टस मध्ये आपल्या नावावर 9 वेळा हा पुरस्कार केला आहे.त्यामुळे तो दुसरा भारतीय फलंदाज आहे.त्याच्यानावापुढे सचिन तेंडूलकरचे नाव आहे.त्याने 10 वेळा आयसीसी टूर्नामेन्टमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाविला आहे.तर तिसर्या स्थानावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे.त्याने 7 वेळा हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.