शिरपूर ।प्रत्येक घराला, कुटुंबाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महिला मनापासून प्रयत्न करतात. पुरुषांच्या बरोबरीने अनेक महिला कामे करु लागली असून त्यांना सर्वत्र सन्मान देखीलआहे. विविध क्षेत्रात महिलांचे स्थान बळकट होवू लागले आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी केले. त्या सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज महिला मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमत्त आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मान करतांना बोलत होत्या. याप्रसंगी महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा मराठे, बांधकाम सभापती संगिता देवरे, चंद्रकलाबाई गायकवाड, वंदना मराठे, विद्या पाटील, कोकीळा सोनवणे, शारदा पाटील, जयश्री शिंदे, सुनिता पाटील, ज्योतीबाई पाटील, नयना मराठे, रंजना मराठे, शांताबाई दुधे, भारतीबाई मराठे, अलकाबाई मराठे, लिनाबाई पाटील, कुसुमबाई मराठे, डॉ.ज्योती काळे, डॉ. मनिषा मराठे, प्रा.नयना पाटील, अलका मराठे, सुचिता मराठे, मंदाकिनी मराठे आदी उपस्थित होते.
शिरपूर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरीकांसह सर्व महिलांची साथ हवीय. भारतीय नारीशक्ती खूपच महान असून मुली व महिलांसाठी अनेक कायदे उपयुक्त् ठरत आहेत असे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिभा मराठे, मनिषा मराठे, सुशिला मराठे, सुषमा मराठे, सुनिता कैलास मराठे, मालती मराठे, मनिषा मराठे, रुपाली मराठे, मालती मराठे, प्रा.डी.बी.मराठे, उपाध्यक्ष आनंदा मराठे, प्रा.अरुण मराठे, कैलास मराठे, अशोक मराठे, सर्व पदाधिकारी, समाज बांधव यांनी कामकाज पाहिले.
सामाजिक दर्जेविषयी चर्चा
मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी माता, जिजाऊ राजमाता, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न.पा. बांधकाम सभापती संगिताताई देवरे यांनीही आपल्या मनोगतात महिलांचे समाजातील महत्वाचे स्थान, नारीशक्ती याबाबत विवेचन केले. चंद्रकलाबाई मराठे, डॉ.ज्योती काळे, डॉ मनिषा मराठे, उन्नती मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनिता कैलास मराठे यांनी केले. सूत्रसंचलन सुशिला मराठे व मनिषा मराठे यांनी तर आभार मालती मराठे यांनी मानले.
महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे
नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी पुढे सांगितले की, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक तसेच अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या खूपच वाढली असल्याची बाब आनंददायी आहे. मुली व महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. घराघरातून मुलामुलींवर संस्कार होणे हे खूप गरजेचे झाले आहे. परदेशात कुटुंबे एकत्र दिसून येत नाहीत, म्हणून त्यांच्याकडे अनेक प्रकारचे डे साजरे केले जातात. परंतु भारतीय संस्कृतीमहान असल्याने तसे अनुकरण आवश्यक नाही. कारण भारतात एकत्र वास्तव्यामुळे वर्षभर 365 दिवस महिलांचा सन्मान होतो. प्रत्येक घरात, समाजात व सर्वत्र महिलांचा सन्मान अजून वाढणे गरजेचे आहे.