भारतीय फलंदाजांनी विंडीजला धू धू धुतले; रोहित शर्माची अनेक विक्रमाला गवसणी !

0

विशाखापट्टणम: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामना आज बुधवारी विशाखापट्टणममध्ये सुरु आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुलचीच चलती दिसून आली. रोहित शर्माच्या दीड शात्कीय आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने विंडीजपुढे धावांचा डोंगर उभा केला आहे. भारतीय फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांना अक्षरश: धू धू धुतले. ५० षटकात भारतीय संघाने ३८७ धावा करत विंडीजपुढे ३८८ धावांचे डोंगरा एवढे लक्ष उभे केले. रोहितने तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची दमदार खेळी 44 व्या षटकापर्यंत कायम होती.

रोहितने 67 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे 43 वे तर विंडीजविरुद्धचे 11 वे अर्धशतक ठरले. अर्धशतकी कामगिरीसह रोहितने महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितने नावावर केला. विंडीजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानं धोनीचा 28 षटकारांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली 25 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितने नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले.