जळगाव । नीती आयोग पुर्नगठन करण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी आज सकाळी 11 वाजेपासून भारतीय मजदूर संघांचे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पी.जे.पाटील, सचिव किरण पाटील, प्रभाकर बाणासुरे, सदाशिव सोनार, बी.बी.सपकाळे, सतिष शिंदे, दिपक घोगरेसह भारतीय मजदूर संघोचे कार्यकर्ते उपस्थित होते.