भारतीय लष्करांकडून ४ दहशतवादी कंठस्नानी

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये रमजान दरम्यान महिनाभर लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपताच भारतीय लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून पुन्हा एकदा ऑपरेशन ऑलआऊट सुरू करण्यात आले आहे. बांदीपोरा येथे सध्या भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. अजूनही चकमक सुरूच आहे. दरम्यान, भारतीय लष्कराला आज (सोमवार) बिजबेहरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांनी या परिसरातील घरांभोवती घेराव घातला आहे.

गेल्या एक महिन्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून शस्त्रसंधी पुकारण्यात आली होती. परंतु, यादरम्यान दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले होते. तसेच २८ जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे केंद्र सरकारने ही शस्त्रसंधी पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. लष्करानेही केंद्राला ही मुदत न वाढवण्याची विनंती केली होती. लष्कराने शस्त्रसंधी संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू असून आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत.