भारतीय लष्करात सेवा देणे अभिमानाची बाब

0

जळगाव । मूळजी जेठा महाविद्यालयाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि एन.सी. सी. महाविद्यालय युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम रोल ऑफ युथ ईन नॅशनल सिक्युरीटी ईन टेव्हॅन्टी फर्स्ट सेन्चुरी विषयावर मेजर श्रुती पाटील (भारतीय थल सेना, लेह डिव्हिजन) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.मूळच्या भुसावळ येथील मेजर श्रुती पाटील यांनी सर्व प्रथम भारतीय लष्करात अधिकारी म्हणून का गेले पाहिजे? या बाबत सविस्तर माहिती उपस्थित छात्र सैनिक आणि विद्यार्थ्यांना दिली. लष्करात अधिकारी म्हणून जाण्यासाठी सी. डी. एस., एस.एस. बी. या परीक्षांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सात दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ यु. डी. कुलकर्णी होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबद्दल तरुणांना जागृत ठेवण्यासाठी कर्तुत्ववान लष्करी अधिकार्‍यांच्या साहसी कथा ऐकणे खूप गरजेचे असते. महाविद्यालयात याविषयाकरिता आयोजित करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी प्रतिपादन केले. जानेवारीत आपल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात एस एस बी मुलाखत तंत्रावर आधारित सात दिवसीय कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विजय लोहार यांनी केले. तर प्रास्ताविक संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे प्रमुख डॉ.एल. पी. वाघ आणि लेफ्ट. डॉ. बी. एन. केसुर यांनी अतिथींचा परिचय करून दिला आणि प्रा. लेफ्ट योगेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे आभार मानलेत. कार्यक्रमासाठी कलाशाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. तायडे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ सौ. देवयानी बेंडाळे, प्रा. डॉ. गौरी राणे, प्रा. डी. डी. बडगुजर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.