भारतीय लोकशाही जगाला मार्गदर्शक : साठे

0

काँग्रेसतर्फे सर्व धर्मिय रोजा इफ्तार पार्टी

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना संविधान सादर केले. तेव्हा खंडप्राय भारतात बहुभाषिक सर्वधर्मिय संस्कृतीचे मुलभूत स्वातंत्र्य हक्क सर्व नागरिकांना प्रदान करण्यात आले. तेव्हापासून स्थापन झालेली सर्वसमावेशक भारतीय लोकशाही जगाला मानवतावादासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे मत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले. शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोरवाडीतील फैजाने निजामी मस्जिदमध्ये सर्व धर्मिय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या इफ्तार पार्टील काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, काँग्रेस प्रदेश सदस्य संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, रामदास भांडारकर, कुमार महाराज, भन्ते शुभज्योती, भंन्ते धम्मबक्षी, बिशप सॅम्युअल सापटणेकर, विश्‍वनाथ खंडाळे, ग्यानी दर्शन सिंगजी, तारीक रिझवी, सज्जी वर्की, मयुर जैस्वाल, हिरा जाधव, मकर यादव, तुषार पाटील, हिरामण खवळे, सतीश कुलकर्णी, समशेर मिर्जा, बाब बनसोडे, फय्याज शेख, अभय म्हात्रे, हमीद शेख, डॉ. मॅन्युअल डिसूजा, लक्ष्मण रुपनर आदींसह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

भारतीय लोकशाही प्रगल्भ
सचिन साठे म्हणाले की, भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिख, इसाई, पारशी धर्मातील स्त्री, पुरुषांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे आहार, विहार, आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. देशातील हजारों हिंदु कुटुंबे मुस्लिम सण, तर हजारों मुस्लिम कुटुंबे हिंदू सण साजरे करताना दिसतात. तसेच आंतरजातीय व आंतरधर्मिय हजारों विवाह दरवर्षी विकसनशील भारतात आता होत आहेत. पंडीत नेहरुंपासून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मानवतावादाला पूरक व पोषक धोरण राबविले. त्यामुळे भारतीय लोकशाही प्रगल्भ झाली.

यावेळी सर्व धर्मगुरुंनी मुस्लिम बांधवांना प्रवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या. स्वागत शहाबुद्दीन शेख यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र बनसोडे केले. मयूर जैयस्वाल यांनी आभार मानले.