नवी मुंबई । अवघा 23 वर्षांचा पॉप स्टार जस्टिन बिबर याच्या बुधवारी रात्री मुंबईत आयोजित लाइव्ह कॉन्सर्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 45 हजार चाहत्यांनी या वेळी गर्दी केली होती. यादरम्यान, जस्टिन म्हणाला, भारतीय लोक सर्वात जास्त उत्साही आहेत, माझ्यासाठी ही एक विस्मरणीय रात्र होती.
जस्टिन बिबरचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी बॉलिवुडच्या अनेक सितार्यांनी हजेरी लावली होती. यात श्रीदेवी, अक्षय कुमार, आलिया भट्ट, सोनाली बेंद्रे, अर्जुन रामपाल, अरबाज खान, अनू मलिक आदींचा समावेश होता. जगभरात आपला ’पर्पज’ हा अल्बम प्रमोट करण्यासाठी जस्टिन वर्ल्ड टूरवर निघाला आहे. बिबरचा हा कार्यक्रम व्हाइट फॉक्स इंडियाने प्रमोट केला. ’हॅरी पॉटर’ची अभिनेत्री अॅलारिका जॉन्सन या शोची होस्ट होती.