कात्रज: भारती विद्यापीठात अतिक्रमण विभागाने कारवाई करून या भागातील अनधिकृत स्टॉल, हातगाड्या, हॉटेलच्या पुढील शेड, पदपथावरील स्टॉल, साइड मार्जिनाला असलेल्या व वाहतुकीला अडथळा ठरणार्या शेड काढून टाकल्या. ह्या कारवाईत विद्यापीठ परिसर, त्रिमूर्ती, काश्मीर मैत्री, चंद्राभाग, सरहद चौक व कात्रज डेअरी, दत्तनगर भुयारी मार्ग तसेच भारती विद्यापीठ समोरील भारती विहार, पतंग प्लाझा सोसायटी समोरील दुकानांसमोर व बाजूस असलेले पत्र्यांचे शेड काढण्यात आले.
दोन दिवस आधी या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. महापालिकाचे पंधरा बिगारी, दोन जेसीबी सहाय्याने अकरा हजार स्क्केअर फूट अतिक्रमण हटविण्यात आले. ह्यामध्ये 12 स्टॉल, दोन फ्रीज, टेम्पो व इतर वस्तू जप्त केले. बांधकाम विभाग, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्ता संध्या गांगरे, बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता नाथा चव्हाण, बांधकाम निरिक्षक उमेश शिद्रुक,अतिक्रमण निरीक्षक शशिकांत टाक,किरण कलशेट्टी यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त कारवाई पार पाडली.