भारती सिंग रुग्णालयात दाखल

0

मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘खतरों के खिलाडी ९’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारती काही स्टंट करत होती. त्या दरम्यान भरतीच्या उजव्या पायाला मार लागण्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे दुखापत झाल्यानंतर भारतीने उपचारदेखील घेतले होते. परंतु त्यानंतरही तिचा त्रास कमी नाही आला. या वाढत्या त्रासामुळेच तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीने प्रचंड मेहनत घेतली असून तिने तिचं वजनदेखील कमी केल्याचं सांगण्यात येत आहे.