भारत्तोलन स्पर्धेत 135 खेळाडूंचा सहभाग

0

फैजपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतर विभागयीय भारत्तोलन, शक्तित्तोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धा (पुरुष) व आंतर महाविद्यालयीन निवड चाचणी (महिला) स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत जळगाव, एरंडोल, धुळे आणि नंदूरबार अशा चारही विभागातील 135 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी व उद्घाटक म्हणून संस्थेचे चेअरमन लिलाधर चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एस.के. चौधरी, व्हा. चेअरमन, प्रा. के.आर. चौधरी, सचिव प्रा. एम.टी. फिरके, गर्व्हिनिंग सदस्य प्रा. पी.एच. राणे, प्रा. डी.ए. नारखेडे, प्रा. एस.एम. चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, प्रा.डॉ. के.पी. पाठक, डॉ. गोविंद मारतळे, प्रा. डी.एच. तांदळे, प्रा. एम.यु. पवार, प्रा. एस.एम. वानखेडे, प्रा. के.जे. वाघ यांनी उपस्थित होते.

शालेय जीवनापासून प्रत्येकाने खेळात सहभाग घ्यावा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरीष चौधरी यांनी आज जीवन जगण्याचे साधन म्हणून खेळाकडे बघावे जेणेकरुन खेळातून पद, पैसा, प्रसिध्दी आणि आरोग्य या गोष्टी आपोआप मिळताच. त्यामुळे शालेय जीवनापासून प्रत्येकाने खेळात सहभाग घेतला पाहिजे, असे सांगितले. डॉ. दिनेश पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदक प्राप्त करुन देणारे महाविद्यालय म्हणून ओळख असलेले महाविद्यालय असे सांगितले आणि येणार्‍या स्पर्धेत सुध्दा या महाविद्यालयाचे खेळाडू पदक प्राप्त करुन देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जळगाव विभागाचा प्रथम क्रमांत
भारत्तोलनमध्ये जळगाव विभागाने 42 गुणांसह प्रथम, 15 गुणांसह धुळे द्वितीय आणि 11 गुण घेवून एरंडोल विभाग तिसर्‍या स्थानी राहिले. शक्तित्तोलनमध्ये जळगाव विभाग 27 गुणांसह प्रथम, 16 गुणांसह एरंडोल द्वितीय आणि 10 गुण घेवून तिसर्‍या क्रमांकावर राहिले तर शरीर सौष्ठवमध्ये 25 गुणांसह जळगाव प्रथम स्थानी, 10 गुणांसह एरंडोल द्वितीय आणि 5 गुणांसह धुळे विभाग तिसर्‍या क्रमांकावर राहिले. भारत्तोलन, शक्तित्तोलन आणि शरीर सौष्ठव या तीन क्रीडा प्रकारातील 8 गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकास सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक तसेच विजयी आणि उपविजयी संघास ट्रॉफी देण्यात आली. विजयी खेळाडू आणि विजयी संघास देण्यात आलेली ट्रॉफी ही दत्त इरिगेशन कंपनीचे चेअरमन जितू पवार यांच्या सौजन्याने देण्यात आली.

विजयी खेळाडूंना पदक
पदक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, फैजपूर पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, क्रीडा संचालक दिनेश पाटील, जितू पवार यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पदक आणि संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गोविंद मारतळे यांनी केले तर आभार प्रा. व्ही.सी. बोरोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. के.पी. पाटील, प्रा. तांदळे, प्रा. पवार, प्रा. चालसे, प्रा. वानखेडे, आर.डी. ठाकूर यांनी सहकार्य केले. पंच म्हणून अविनाश महाजन, योगेश महाजन यांनी काम पाहिले.