भारत अजून हिंमत हरलेला नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणले कि , कोविड १९ विरुद्धची लढाई भारत लढत असून भारत अजून हिंमत हरलेला नाही. भारताचे नागरिक अजून हिंमत हारलेले नाहीत.

यावेळी त्यांनी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाचीही माहिती दिली. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, देशातल्या एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून १९ कोटी रुपये जमा कऱण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा आठवा टप्पा जमा करण्यात आला. त्याप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. बंगालमधल्या शेतकऱ्यांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.