नवी दिल्ली-डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी आज केवळ 3 मिनिटात एक उपग्रह पाडले. त्यामुळे आज भारत अंतराळ क्षेत्रात महाशक्ती बनला आहे. देशासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. त्यांनी आज देशाच्या नागरिकांशी संवाद साधत ही घोषणा केली. अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात अभिमानास्पद कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला आहे. ‘मिशनशक्ती’ असे ऑपेरेशनचे नाव होते. भारत यामुळे सुपर पॉवर बनला आहे. मोदींनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठी घोषण करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सकाळपासून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले होते.
काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडले आहे. भारताने अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे नाव नोंदवले असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असेही मोदी म्हणाले. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतल्यानं भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात यश मिळाले आहे.