भारत आणि इंग्लंड मध्ये अखेरचा कसोटी सामना आजपासून

0

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील अखेरच्या सामन्यास शुक्रवारपासून ओव्हल मैदानावर सुरुवात होणार आहे. भारताने यापूर्वीच ही मालिका १-३ अशी गमावली असली, तरी अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताचा संघ उत्सुक असेल.

त्याचवेळी इंग्लंड संघातील अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कुक या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याने त्याला विजयी समारोप देण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्न करेल.