मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यापैकी पहिला सामना राजकोट तर दुसरा सामना हैदराबादमध्ये होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने एका जाहिरातीत याची माहीती दिली.
या दौऱ्यात भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी, पाच एकदिवसीय तर तीन टी-२० सामने रंगणार आहेत. कसोटीतला पहिला सामना ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राजकोटला तर दुसरा सामना १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हैदराबादेत होणार आहे. कसोटीनंतर २१ ऑक्टोबरपासून पाच वनडे सामन्यांची मालिका होईल.
कसोटी सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण –
४ ते ८ ऑक्टोबर – राजकोट
१२ ते १६ ऑक्टोबर – हैदराबाद
वनडे सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण –
२१ ऑक्टोबर – गुवाहाटी
२४ ऑक्टोबर – इंदुर
२७ ऑक्टोबर – पुणे
२९ ऑक्टोबर – मुंबई
५ नोव्हेंबर – तिरुवनंतपुरम