भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची व्हर्चुअल चर्चा
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ संबंध आणि द्विपक्षीय भागीदारी वाढविण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे व्हर्चुअल शिखर संमेलन पार पडले. या शिखर परिषदेत प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवर व आर्थिक मुद्द्यांवर भारतासोबत स्कॉट मॉरिसन काम करणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली.
भागीदारी वाढविण्यासाठी दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानचा व्यापार, गुंतवणूक, राजकीय संबंध, परराष्ट्रीय स्थरावरील रणनिती आशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांदरम्यान झालेल्या या शिखर परिषदेत युक्रे नच्या संकटावरही चर्चा झाली. व्हर्च्युअल शिखर संमेलन एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून सरकारच्या प्रमुखांच्या पातळीवर वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्याचा निर्णय होता. ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश असेल ज्यासोबत भारताची संस्थात्मक वार्षिक परिषद होईल असेही हर्षवर्धन श्र ृंगला यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले, गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध खूप सुधारले आहेत. दोन्ही देश आगामी काळात व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, शिक्षण आणि नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात एकत्र काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार लवकर पूर्ण होणे हे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंध आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचे असेल. क्वाडमध्येही आमचे चांगले सहकार्य आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आम्ही नेहमीच मदतीस तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.