जळगाव । राष्ट्रीय कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी केंद्र सरकारला शेतकर्यांच्या विकासासाठी, ग्रामीण भागाच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठी काही सविस्तर शिफारशी 2004 मध्ये सादर केल्या होत्या. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही पुर्णपणे न झाल्याने भारत कृषक समाजातर्फे डॉ.स्वामीनाथन यांना साकडे घालण्यात आले.
30 कलमी मागण्या
नुकतेच मुख्यमंत्र्यांना शेतकर्यांच्या विकासासाठी 30 कलमी मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याचाच पाठपुरावा डॉ. स्वामीनाथन यांना चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे, मिलिंद राऊत, अविनाश गवई यांनी पुणे येथे भेटी दरम्यान केला. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारला लिहीन असे ठोस आश्वासन भारत कृषक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले यात प्रामुख्याने कर्ज माफी, हमी भाव अधिकनफा पिक विमा, नुकसान भरपाई, फळ भाजीपाला, अन्न धान्य प्रक्रिया उद्योग, शेतकरी आमदार विज पुरवठा, रोजगार हमी योजना शेतकर्यांच्या शेतात मासीक 20 हजार रूपयांचे मानधन वगैरे व इतर मागण्यांचा समावेश होता.