‘भारत’ चित्रपटाचा टीजर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

0

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि बॉलीवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ यांच्या ‘भारत’ चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. चाहत्यांना या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘भारत’ चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर हे नेहमी या चित्रपटाचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या रूपात दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीजर २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.