भारत चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण करणार रस्त्यांचे जाळे

0

नवी दिल्ली-चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्यदल सतर्क आहे. भारत भारतीय हद्दीत येणाऱ्या सीमेवर रस्ते आणि सामरिक भावनाचे जाळे निर्माण करणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यात २५ हजार कोटी रुपये खर्च करून १९ रस्ते आणि २९ भवन उभारणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने याला मंजुरी दिली आहे. लवकरच यास सुरक्षा संबंधी समिती समोर ठेवण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्य वगळता गुजरात, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, मेघालय, मिजोरम आणि त्रिपुरा या राज्यांना लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय सिमेबाबत विचार केला जाणार आहे.