भारत-चीन वादात पाकची कुरघोडी

0

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन देशांमध्ये वाद आता विकोपाला पोहोचू लागला आहे. अशा वेळी परिस्थितीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने आता या वादात कुरबुरी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चीनचे राजदूत लू झाहाई यांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी भुतानचे राजदूत वेट्सोप नामगैल यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

डोकलामच्या विषयावर चर्चेला सुरुवात
बासित हे चीन आणि भुतान या दोन्ही देशांच्या राजदुतांना भेटू डोकलामच्या विषयावर चर्चा करत आहेत. बासित यांनी उच्चायुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढच्या महिन्यात ते इस्लामाबाद येथे परतणार आहेत. दुसरीकडे बीजिंग हा सध्या जगाला दाखण्याचा प्रयत्न करत आहे की, भारत हा चीन आणि भूतान यांच्यातील डोकलाम वादात मुद्दा नाक घुसवत आहे. चीनचे म्हणणे आहे की, हा वाद चीन आणि भुतान यांच्यातील आहे, भारताने यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे.