भारत देशातील हिंदूंचे वैभव असलेला कुंभमेळा

0

महामंडलेश्वर जनार्दन महाराज ; शाही स्नानाला लोटला प्रयागराजमध्ये लाखोंचा महासागर

फैजपूर- ज्या देशात, ज्या भूमीत ज्या मातीत आपण जन्म घेतला त्याचा आपल्याला अभिमान व वैभव असला पाहिजे इतकेच काय तर कुंभमेळा हा समस्त हिंदूंचे वैभव असल्याचा अभिमान आहे, असे विचार महामंडलेशवर जनार्दन हरीरजी महाराज यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात गोपी गीतातून भाविकांना आशिर्वचन प्रसंगी व्यक्त केले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रयागराज 10 ते 19 जानेवारी दरम्यान गोपीगीत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे
जनार्दन महाराज म्हणाले की, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत नियम असतात जर नियमानुसार कथेचे श्रवण केले तर त्या कथेतून संस्कार आपल्याला मिळतील. आपला देश हा कृषी प्रधान देश आहे शेतकरी जे पिकवतात तेच आपण खातो तेच आपले अन्न आहे. श्रीमंती असली म्हणून आपण सोने-चांदी खात नाही, शेतातीलच आपण पिकवलेली अन्न खातो म्हणून कधी पैशाचा श्रीमंतीचा गर्व करू नका. आजची तरुण पिढी ही व्यसनात न्हाऊन निघत आहे, शरीरातील एकही वस्तू खराब झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करून ती मिळणार नाही म्हणून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे, असेही महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले.

विदेशी महिलांना गोपी गीतात मिळाले स्थान
महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांचे प्रयागराज येथे गोपी गीत कथा सुरू असून गोपी गीत कथेत रोज नव-नवीन सजीव देखावे साकारण्यात येतात. यात विदेशी महिलादेखील मागे नाहीत. कुंभमेळ्यात आलेल्या विदेशी महिलांना कृष्ण राधा व गोपिका यांचे वेशभूषा करून व्यासपीठावर भारतीयान प्रमाणे नृत्य सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. विदेशी महिलांच्या चेहर्‍यावर जो आनंद होता तो अविस्मरणीय होता.

जनार्दन महाराज यांची शाही स्नानाची मिरवून भव्य
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील शाही स्नानाला हिंदू संस्कृतीनुसार मोठे असून त्यातच 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्याने अधिक महत्व शाही स्नानाला दिले जाते. या शाही स्नानासाठी भारतातून नव्हे तर विदेशातून भाविक शाही स्नानाला कुंभमेळ्यासाठी दाखल होतात. कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगा, जमूना व सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने अधिकच महत्व आहे. प्रत्येक आखाड्याला शाहीस्नाना साठी वेळ दिला असतो. निर्मल आखाडा यांच्या कडून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची भव्य शाही मिरवून वाजत गाजत काढण्यात आली.

कुंभमेळा येथे शिस्तीचे दर्शन
प्रयागराज येथील गंगा नदीपात्रात भव्य-दिव्य अर्ध महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार न घडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने संपूर्ण खबरदारी घेतली असून प्रत्येक आखाड्यात सीसीटीव्ही कॉमेरा लावण्यात आले आहेत. 1