मुंबई – महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळने आयोजित केलेल्या १३ व्या डॉ. डी.आर गागीळ समृती व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भारताच्या नवीन आर्थिक परिस्थितीमधील बदल या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर रेल्वेमंत्र्यांनी दिवंगत डॉ.डी.आर.गाडगीळ यांच्या सेवांचा गौरव केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी सांगितले की, भारत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजर सरकारने हाती घेतलेल्या मेक इन इंडिया मोहिम आणि स्वच्छ भारत अभियान यांच्यासारख्या नवीन उपक्रमांद्वारे भारत नजीकच्या भविष्यात एक गेम चेंजर ठरेल. रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत जीडीपी वाढत होता. परतु उत्पादन क्षेत्राचे त्यातील योगदान फारसे नव्हते. सुमारे २/3 जीडीपी एकट्या सेवा क्षेत्रातून येत होता आणि देशाच्या जीडीपीच्या वाढीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान वाढवण्यासाठी भारताला ही परिस्थिती वदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी क्षेत्राच्या स्वत:च्या मर्यादा
कॉर्पोरेट कंपन्या सर्वकाही बदलू शकतात परंतु समस्या अशी आहे की सिव्हिल क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढत नाही. त्यामुळे खासगी क्षेत्राच्याही स्वत:च्या मर्यादा आहेत असे प्रभूंनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत गाडगीळांचे योगदान मोठे
डॉ. डी.आर.गाडगीळ यांच्याबद्दल सांगताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत गाडगीळ यांचे मोठे योगदान म्हणजे महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यातील त्यांची भूमिका हे आहे. आपण देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी क्षेत्राला चालना दिली तर गाडगीळ यांना ती आदरांजली ठरेल.