भारत-पाकिस्तान युध्दातील ऐतिहासीक रणगाडा भुसावळ ऑर्डनन्समध्ये

मुख्य महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्याहस्ते टँकचे अनावरण

भुसावळ : भारत-पाकिस्तानच्या 1971 च्या युद्धात सामील असलेला टी 55 टँक (रणगाडा) ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ इस्टेटमध्ये ठेवण्यात आला आहे. हा ऐतिहासिक टँक आता भुसावळ आयुध निर्माणीची शोभा वाढविणार आहे. या टँकचे अनावरण नुकतेच आयुध निर्माणीचे मुख्य महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्याहस्ते करण्यात आले.

भारतीय सैनाच्या 1960 मधील भारतीय सैन्याचा भाग असलेला टी 55 टँक बनला होता. जगातील सर्व देशांमध्ये या सर्वात जास्त वापरला जाणारा टैंक आहे. त्याच्यावर 100 एमएमची मुख्य तोफ असते. दोन 7. 6 एमएमच्या मशीन गन आणि एक 12. 7 एमएमची विमानभेदी तोफ बसवलेली असते 1971 च्या भारत-पाक युद्धात टी 55 टैंकने मोठी भूमिका बजावली होती. युद्धाच्या शेवटी, भारतीय सैन्याने दावा केला की 226 पाकिस्तानी टैक नष्ट केले गेले. या टँकमध्ये कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा 4 सैनिकांची टीम टैंकला चालवते. हा जगातील एकमेव टँक होता की त्या काळात युद्धात शत्रूचा पराभव करण्यास सक्षम मानला जात होता.

अनावरण प्रसंगी यांची होती उपस्थिती
या टँकच्या अनावरण प्रसंगी आयुध निर्माणीचे कार्यालयीन अधिक्षक ए.एस.भटनागर, एजीएम सुकांता सरकार, दीपशिखा महिला कल्याण समितीच्या उपाध्यक्षा सुदिप्ता सरकार, सचिव पूनम प्रजापती व त्यांच्या सर्व पदाधिकारी महिला सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम, थ्री, जेसीएम, फोर्थ सदस्य, कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी यांनी उपस्थिती दिली. या टँक चे मेंटेनन्स, कलरिंग व सजावट लायटींग आणी फाउंडेशनच्या उभारणीत सहकार्य करणारे विभागांचे अधिकारी, कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

भुसावळकरांना पाहण्याची संधी
टँकचे वजन 36 हजार किलो आहे. ताशी 50 किमी वेगाने चालतांना 14 कि.मी दुर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर अचुक मारा करू शकते. हा टॅँक सर्व भुसावळवासीयांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याची माहिती आयुध निर्माणी भुसावळचे डीजीएम तथा जनसंपर्क अधिकारी बी.देवीचंद यांनी दिली.