भारत-पाकिस्तान 10 वर्षांनी आमने-सामने

0

मुंबई। भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी चॅम्पियन ट्रॉफीची अंतिम लढत होणार आहे.या ट्रॉफीच्या आठव्या सत्रात पहिल्यांदाच या दोन्ही प्रतिस्पर्धी देशात अंतिम सामना होत आहे.याचबरोबर या ट्रॉफीत प्रथम अंतिम सामन्यात पाकिस्तान प्रवेश मिळविला आहे.

यापूर्वी आयसीसीच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत -पाकिस्तान संघ समोरा-समोर आले होते. यावेळी विश्वचषकातील विक्रम अबाधित ठेवत भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या पहिल्या विश्वचषकात धोनीच्या चाल ने भारताला पुन्हा विजय मिळवून दिला.