मुंबई – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने उद्या सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून सोमवारी होणाऱ्या भारत बंद बाबत भुमिका कळवली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत भारत बंदला पाठिंब्याचा निर्णय झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमधील मनसेचे पदाधिकारी या बैठकीला हजेर होते.
मनसे या भारत बंदमध्ये पूर्णपणे सहभागी होणार आहे. यासाठी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच बंददरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असेही आश्वासन मनसेने दिले आहे.
काँग्रेसने देशभरात सुरू असलेली इंधन दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या मुद्द्यांवर ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. त्याचाच भाग काँग्रेसने म्हणून सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ ठेवण्याचे आवाहन केले आहे.