भारत बंद: अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकल अडवण्याचा प्रयत्न

0

मुंबई – पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अशोक चव्हाण यांच्यासहीत सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त रेल्वे रुळावर उतरले आणि यावेळी त्यांनी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेससह आज विविध पक्षांकडून पेट्रोल दरवाढी विरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माणिकराव ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.