भारत बंद: जळगावात भाजपकडून मोदींचा जयघोष !

0

जळगाव-आज इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने संपूर्ण भारत बंदची हाक दिली आहे. जळगावात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मार्केट बंद ठेव्याचे आवाहन केले. मात्र फुले मार्केटमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादीची काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बंद ठेवण्याचे आवाहन केले जात असतांनाच याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचा जयघोष करत घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.