भारत बंदनिमित्त प्रमुख विरोधी पक्षनेते एकत्र

0

नवी दिल्ली-आज इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सक्रिय सहभाग या बंदमध्ये नोंदविला आहे. दरम्यान भारत बंदच्या निमित्ताने विविध विरोधी पक्षाचे नेते आज दिल्लीत एकाच व्यासपीठावर जमले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शरद यादव, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदी एकाच व्यासपिठावर जमले आहे.