भारत भूमीला मिळाले महापुरुषांना जन्म देण्याचे सौभाग्य

0

फैजपूर । भारताची भूमी ही युगायुगापासून ऋषीमुनींची, महापुरुषांची भूमी आहे. या भारत वसुंधरेचे परम सौभाग्य आहे की या भूमिवर आदिनाथ, महावीर स्वामी, मर्यादा पुरुषोत्तम राम, महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांना जन्म देण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन श्रमण मुनीश्री विशेषसागर यांनी केले. राष्ट्रसंत गणाचार्य विराटसागर यांच्या जन्म जयंती महोत्सवाप्रसंगी संबोधित करतांना ते बोलत होते.

विराटसागर वैरागी निस्पृह व्यक्तिमत्व
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, गुरुदेव आचार्या विराटसागर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दर्शनची अनुभुती व ज्ञानाची उपयोगिता, योगमध्ये समता, आईची ममता, वैरागीची निस्पृहता यांचे साक्षात दर्शन होते. त्यांनी आपल्या संयम काळात खुप उतार-चढाव बघितले. शिष्यांना संग्रह, निग्रह करण्यामध्ये कुशल आहे. आपल्या 37 वर्षांच्या साधना काळात 10 राज्यांमध्ये पद विहार करुन सुमारे 205 आत्म्यांना संयम प्रदान करुन मोक्ष मार्गास लावले असल्याचे सांगितले.

विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
गुरुदेवांचा संघ वर्तमान काळातील सर्वश्रेष्ठ धर्म श्रावक संघ आहेे. यावेळी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी 6.30 वाजता अभिषेक व एक हजार नावांनी सहस्त्रनाम, महामस्तकाभिषेक आणि शांतीधारा, दुपारी 1 वाजता शांतीनाथ विधान आणि गणाचार्य विराटसागर विधानाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 6.30 वाजेपासून गुरुभक्ति, आरती आणि आनंदयात्रा संपन्न झाली. संपूर्ण विधीविधान कुसुंबा येथील पंडीत संजय यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. यावेळी परिसरातील जैन समाजबांधव उपस्थित होते.