मुंबई: सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ मध्ये प्रियांका चोप्राने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिची जागा कोण घेणार असा मोठा प्रश्न होता. मात्र यात कतरीना कैफने बाजी मारली आहे. कतरीना आणि सलमान खान अनेक चित्रपट एकत्र केले आहेत आणि सगळेच बॉक्स ऑफिसवर हिट ही ठरले आहेत.
भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा ‘ओड टू माय फादर’वर आधारीत आहे. ‘भारत’ चित्रपटाची कथा 1947 म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल.या सिनेमात सलमान व कतरिना यांच्या व्यतिरिक्त दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.