हिसार । नुकत्याच अमरनाथ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटनेनंतर या हल्ल्याविरोधात देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याविरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. हिसारमध्येही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलकांनी एका मौलवीला धक्काबुक्की करत चक्क कानशिलात लगावली. हिसारमध्ये अनंतनाग हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलक दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याची विटंबना करत होते. हुजून एक लाहौरिया चौकात आंदोलनकर्ते आल्यानंतर त्यांनी तेथील मशिदेपुढे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
हिसार । नुकत्याच अमरनाथ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटनेनंतर या हल्ल्याविरोधात देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.‘भारत माता की जय’ अशा घोषणामुळे परिसर दणाणून सोडले. मौलवी आंदोलकांचा आवाज ऐकून बाहेर आले. आंदोलकांनी या मौलवीला भारत माता की जय म्हणण्यास सांगितले. पण मौलवीने म्हणण्यास नकार दिल्याने संतप्त आंदोलकांनी या मौलवीला धक्काबुक्की करत कानशिलात लगावली. मौलवी मशीदमध्ये निघून गेल्यानंतर काही काळ आंदोलक मशिदेबाहेर घोषणाबाजी करत राहिले.