भारत माता की जय म्हणत मोदींच्या आवाहनाला जळगावातून उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगावात पुनश्च दिवाळीचा अनुभव

जळगाव– कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळीनाद नंतर आज रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला जळगावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करीत भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक कॉलनी परिसरातून एक दिवा देशासाठी हा सामूहिक संदेश नागरिकांनी दिला.