भारत विकास परिषदेतर्फे 105 विद्यार्थ्यांची दंत तपासणी

0

जळगाव: येथील भारत विकास परिषद व इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगरातील कै.इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेतील 105 विद्यार्थ्यांची डॉ. योगेश पाटील यांनी मोफत दंत तपासणी करुन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना ब्रश, पेस्ट व खाऊचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास भाविपचे अध्यक्ष प्रशांत महाजन, रवींद्र लढ्ढा, प्रसन्न मांडे, ज्योती लढ्ढा, संजीव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मुख्याध्यापक तायडे व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची सहकार्य लाभले.