भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश…

न्हावी प्रतिनिधी दि 22 बन्सल क्लासेस जळगाव स्टडी सेंटर तर्फे जिल्हास्तरीय WORDS OF WISDOM ही निबंध स्पर्धा 28 ऑगस्ट 2023 या दिवशी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी येथे घेण्यात आली यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी च्या 108 विद्यार्थ्यांचा सहभाग होता सदर निबंध स्पर्धेकरिता विषय पुढीलप्रमाणे होता :- जागतिक तापमान वाढीचे कारणे व उपाय असा विषय होता यामध्ये LEVEL- I मध्ये प्रथम क्रमांक नंदिनी पूनमचंद नार्वे आठवी ब हिला 1001 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले द्वितीय क्रमांक पूर्वा लीलाधर जिरीमाळी दहावी अ हिला 501 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले तर तृतीय क्रमांक वैष्णवी पुरुषोत्तम श्रीखंडे आठवी ब हिला 301 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले सदर विद्यार्थिनी LEVEL – 2 साठी जळगाव येथे जिल्हा स्तरावर आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करतील सदर स्पर्धे करिता शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी पर्यवेक्षक एन एन अजलसोंडे यांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच सदर विद्यार्थ्यांना उपशिक्षिका कांचन चौधरी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.