भारत विद्यालयात महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा संपन्न…

न्हावी प्रतिनिधी दि 12 भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा 2023- 24 घेण्यात आल्या सदर स्पर्धा दरवर्षाप्रमाणे पंचायत समिती शिक्षण विभाग यावल यांच्यातर्फे राबविण्यात येतात ही स्पर्धा दिनांक 11/ 8/ 2023 शुक्रवार रोजी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आली या स्पर्धेत एकूण 102 विद्यार्थी सहभागी होते स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रमाणबद्ध व विषयाला अनुसरून रंगकाम केले याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक व्ही बी वारके संगीता फिरके शोभा तळेले व अन्य शिक्षकांनी स्पर्धे ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले तसेच चित्रकला विषय स्पर्धा समिती प्रमुख व्ही ओ चौधरी सी पी भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

.