नवी दिल्ली-सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. ४ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेला सुरुवात होणार असून, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजने जेसन होल्डरकडे नेतृत्व दिले आहे. डेवॉन स्मिथला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
असा असेल संघ
जेसन होल्डर (कर्णधार), सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डॉव्रिच, शेनॉन गॅब्रिएल, जहामार हॅमिल्टन, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच, जोमिएल वारिकेन