भारत वि.ऑस्ट्रेलिया: आज भारताची ‘अग्नीपरीक्षा’

0

सिडनी-भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन टी-२० मालिका सुरु आहे. आज मालिकेतील अंतिम सामना आहे. या अगोदर दोन सामने खेळले गेले असून त्यात एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळविले आहे, तर एक सामना पावसामुळे अनिर्णीत राहील आहे. त्यामुळे ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात आहे. मात्र आजचा शेवटचा सामना भारताने जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटू शकते. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने भारतीय संघाची अग्नीपरीक्षा आहे.

संभाव्य भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, खलील अहमद/युजवेंद्र चहल हा संभाव्य संघ असणार आहे.