भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी सामना: अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला

0

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चार कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. भारताने ६२२ धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाची सध्या २३६ धावांवर ६ गडी बाद अशी स्थिती आहे. मात्र आज अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबिण्यात आला आहे.

चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत याच्या मोठ्या धडाक्यामुळे भारताने चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात ७ बाद ६२२ असा डोंगर उभारला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने सावध पवित्रा घेत बिनबाद २४ धावांची वाटचाल केली आहे. दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी संपादन केली आहे. ही मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाचा मान आणखी उंचावणार आहे.