मुंबई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज मंगळवारी एकदिवशीय सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. कारण संपूर्ण भारतीय संघ २५५ धावांवर गडगडला आहे. बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियासमोर २५५ धावांचे लक्ष तोकडेच आहे. १० धावांवर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दबावात असलेल्या भारतीय संघाला शिखर धवन आणि लोकेश राहुलने सावरण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने ७४ तर लोकेश राहुलने ४७ धावा केल्या.