हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताने मोठा विजय नोंदविला. आज पुन्हा विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आजपासून भारत आणि वेस इंडीज संघात दुसरी कसोटी खेळली जात आहे. दुसरीकडे कामगिरीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने वेस्ट इंडीज संघ मैदानात उतरला आहे. खेळाला सुरुवात झाली असून पाहुणा वेस्ट इंडीज संघ प्रथम फलंदाजी करत आहे. सध्या स्थितीत वेस्ट इंडीजची स्थिती ५४ धावांवर २ बळी बाद अशी आहे.
राजकोटच्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव २७२ धावांनी तीन दिवसांत विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यातही असेच चित्र राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर पूर्णपणे फिट नसून, त्यांचा एकमेव वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियल याचे खेळणेदेखील शंकास्पद आहे. भारताने पहिल्या सामन्यातील विजयी संघ या सामन्यातही कायम ठेवला.
असे आहेत संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेज, शेन डोवरिच, शेनन गॅब्रियल, जहमर हॅमिल्टन, शिमरोन हेटमायर, शाय होप, अलझारी जोसेफ, कीमो पॉल, कीरेन पॉवेल, केमार रोच आणि जोमेल वारिकन.