भारत व्यसनमुक्त करण्यासाठी सुरूवात चाळीसगावपासून करू या

0

चाळीसगाव येथे व्यसनमुक्तीवर प्रोजेक्ट दाखवून केले मार्गदर्शन

चाळीसगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रमात सुचिता राजपुत यांच संकल्पना

चाळीसगाव – व्यसनमुक्त चाळीसगाव, महाराष्ट्र, भारत, व्यसनमुक्त केला पाहिजे. याची जनजागृती चाळीसगावपासून सुरुवात करु अशी संकल्पना सुचिता राजपुत यांना सुचल्यावरुन त्यांनी चाळीसगाव येथे ३१ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेवुन व्यसनमुक्ती वर चे प्रोजेक्ट दाखवून माहिती दिली. संकल्पना सुचिता राजपूत यांनी ८-१० दिवसापुर्वी ग्रुप तयार करून सर्व ग्रुप सदस्यांना कळवले होते. आपण व्यसनमुक्त चाळीसगाव महाराष्ट्र भारत व्यसनमुक्त केला पाहिजे. म्हणून याची जनजागृती आपण चाळीसगावपासून सुरूवात करु अशी संकल्पना देऊन त्यांनी ३१ डिसेंबर रोजी मुंबईहून त्या चाळीसगावला येवुन शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी व्यसनमुक्तीवरचे प्रोजेक्ट दाखवून त्याबाबत माहिती दिली. यावेळी सर्व ग्रुप मेंबर यांची ओळख करून सर्वांनी व्यसनमुक्ती वर जनजागृती करून आपल्या आपल्या पद्धतीने माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुचिता राजपूत, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद कोतकर, वडगाव लांबे सरपंच राजू राजपूत, शिवसेनेच्या सविता कुमावत, डॉक्टर स्वर्ण सिंह राजपूत कारगाव, पोलीस नाईक विजय शिंदे, कवी रमेश पोतदार, अभिजीत पाटील, निलेश राजपूत, सुनील तकतसिंग राजपूत, सुनील नागमोती, अभिजित पवार, किरण जोशी, महेंद्र चव्हाण, राजेंद्र जाधव, दादा गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, कुणाल राजपूत, रावसाहेब पाटील, जगदीश राजपूत उपस्थित होते.