भारत श्रीलंका आज चॅम्पियन ट्रॉफीत आमने सामने

0

लंडन । भारत विरुद्ध श्रीलंकेची चॅम्पियन्स ट्रॉफीत आज लढत रंगणार आहे. भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकला पहिल्या सामन्यात पराभूत केले आहे. श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या सामन्यात पराभवचा करावा लागला आहे. भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी मागील सामन्यात शानदार परफॉर्मन्स दिला होता. श्रीलंकेसमोर सगळ्यात मोठी समस्या ही उपकप्तान उपुल थरंगा संघाबाहेर असणे ही आहे.भारतासाठी श्रीलंकेविरूध्द विजय उपात्य फेरीत प्रवेश निश्‍चित करणारा असेल तर श्रीलंकेला विजयाची आवश्यकता आहे.विजय नाही मिळाल्यास त्यांचा पुढचा प्रवास खडतर होणार आहे.

भारत श्रीलंका सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.भारतासाठी चितेचा विषय राहणार तो भारतीय खेळाडूकडून पाकविरूध्दच्या सामन्यात झालेली मिस-फिल्डींग व झेल सोडणे.ही बाब चितेची राहणार आहे.याबाबीवर विराट कोहली नाराज आहे.मात्र मागील चुका पुन्हा होवू नये यासाठी भारतीय संघाने सरावमध्ये चांगला घाम गाळला आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूंची फील्डिंग या सामन्यात खुपच कुमकुवत होती. सर्वात जास्त निराश सीनियर प्लेअर लसिथ मलिंगाने केले. त्याने 17 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फॉफ डु प्लेसिसचा सोपा कॅच सोडला. त्यावेळी प्लेसिस हा 8 या आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत होता. या जीवनदानानंतर त्याने 5 रनची इनिंग खेळली होती.श्रीलंकेच्या संघाची सगळ्यात मोठी समस्या ही त्यांची बॅट्समॅनचा खराब परफॉरमन्स ही आहे. डिकवेला, थरंगा आणि कुसल परेरा सोडल्यास कोणताही बॅट्समॅन हा दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर टिकू शकला नव्हता. डिकवेलाने 41 रन (33 बॉल) आणि थरंगा ने 57 रन (69 बॉल) करुन टीमला जोरदार सुरुवात दिली होती.ओपनर्स नंतर परेरा सोडल्यास पुर्ण मिडर ऑर्डर फ्लॉप राहिली होती. परेराने 6 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना 44 रन ची इनिंग खेळली होती.