रांची । भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात स्वत:त तंबूत परतला मात्र चेतेश्वर पुजाराने आपल्या फलंदाजीची जादू दाखविली.पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसर्या कसोटी सामन्याचा तिसर्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसअखेर भारताने 6 गडी गमावून 360 धावा केल्या.खेळाच्या पहिल्या सत्रात मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिली.पुजाराव्यतिरिक्त लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय (82) यांनी अर्धशतक केले. ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेला युवा गोलंदाज कमिंस कंगारु सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विराट कोहलीसोबत चार विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 91 धावांनी पिछाडीवर होता.भारताचे चार गडी अद्याप बाकी आहेत.
पुजारा 130 धावांवर नाबाद
भारत अजूनही 91 धावांनी पिछाडीवर आहे. पुजारासोबत विकेटकीपर रिद्धिमान साहा 18 धावांसह मैदानावर आहे. तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने सर्वात अगोदर मुरली विजयची विकेट गमावली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (14) आणि विराट कोहलीच्या (6) रुपाने दोन महत्वाचे गडी बाद झाले. मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या शेवट्या सत्रात नायर (23) आणि अश्विन (3) यांची विकेट घेत भारताला अजून दोन झटके दिले. अंतिम सत्रात भारताने फक्त 57 धावा केल्या. पुजारा मैदानावर अजून खेळत असल्याने भारताच्या आशा कायम आहेत.
याअगोदर भारताने लंचपर्यंत दोन विकेट गमावत 193 धावा केल्या होत्या. दुस-या सत्रात 110 धावा केल्या होत्या. लंचनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून खूप सा-या अपेक्षा होत्या. क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने विराटने मैदान सोडले होते मात्र विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. अजिंक्य रहाणेने सुरुवात केली तेव्हा लय सापडल्याचे दिसत होते. मात्र बाऊन्स न समजल्याने मॅथ्यू वेडच्या हाती त्याची विकेट गेली. पुजाराने केलेले शकत या मालिकेतील भारतीय फलंदाजाचे पहिले शतक ठरले आहे.
पहिल्याच दिवशी खांद्याला दुखापत झाल्यामुळे विराट कोहली या सामन्यात खेळू शकणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होत्या. सर्व शंकाना पूर्णविराम देत विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र केवळ 6 धावा करुन विराट आऊट झाला.
तिसर्या दिवसाचा खेळ
तिसर्या दिवशी भारताच्या डावाची सुरुवात चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी केली. विजय आणि पुजारीने दुसर्या विकेटसाठी 39.2 षटकांमध्ये 102 धावांची भागिदारी केली.70.4 षटकामध्ये कीफेने मुरली विजयला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. 183 चेंडूत विजयने 82 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान विजयने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले. या सामन्यात मुरली विजयने त्याच्या टेस्ट करिअरचे 15वे अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरोधात त्याची ही सहावी अर्धशतकी खेळी होती. विजय बाद झाल्यानंर फलंदाजीसाठी उतरलेला विराट केवळ 6 धावा करुन तंबुत परतला. पॅट कमिंसने भारताला चौथा झटका दिला. 91.2 षटकात पिटचा बाऊंसर बॉल खेळण्याच्या प्रयत्नात मॅथ्यु हेडकडे सोपा झेल देत अजिंक्य रहाणे (14) आऊट झाला.लंचब्रेकनंतर भारताची पाचवी विकेट पडली. 107.4 षटकामध्ये हेजलवुडने करुण नायरला त्रिफळाचित केले. करुन नायरने 23 धावा केल्या.115.4 षटकात आर. अश्विन केवळ 3 धावा करुन बाद झाला. पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर वेडने त्याला झेलबाद केले.
भारतीय खेळाडूचे मालिकेतील पहिले शतक
तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराने आज शानदार खेळी करत शतक ठोकले. पुजाराने 214 चेंडुत 100 धावा पूर्ण केल्या. आपल्या खेळीमध्ये पुजाराने 14 चौकार लगावले. आपल्या टेस्ट करिअरमधील पुजाराचे हे 11वे शतक होते. तर ऑस्ट्रेलियाविरोधात दुसरे शतक होते. या मालिकेत आतापर्यंत तीन शतके झाली आहेत. यातील दोन स्टिव्ह स्मिथ आणि एक ग्लेन मॅक्सवेलचे शतक आहे.
ऑस्ट्रेलियाकडून रिव्ह्यूचा वापर
भारताची सहावी विकेट गेली आहे. आर.आश्विन विकेटकीपरकडे कॅच देत तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने त्याला एका शॉर्ट बॉलवर बाद केले. यावेळी आश्विन आऊट नाही असे अंपायरचे म्हणणे होते पण ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यूचा वापर केल्यानंतर त्यात बॉल आश्विनच्या ग्लोव्हला घासून गेल्याचे दिसल्याने त्याला आऊट घोषित करण्यात आले .
विजय व चेतेश्वरांचा विक्रम
मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी आपल्या नावावर एक विक्रम केला आहे.या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी करतांना 37 कसोटी साम्यात 2500 धावा केल्या आहे.जे भारतासाठी जो एक विक्रम आहे.यापुर्वी हा विक्रम राहुल द्रविड व सचिन तेडूलकर याच्या नावावर होता .त्यांनी 42 कसोटीत खेळत 2500 धावा केल्या होत्या.जेव्हा या विक्रमात तिसर्या क्रमांकासाठी द्रविड व सहवाग यांनी 42 कसोटी खेळत 2500 धावा केल्या होत्या.