भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

0

यवत । शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी (केडगाव, ता. दौंड) येथील उपविभागीय महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.बाबासाहेब धुमाळ, महेश पासलकर, अनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी धुमाळ बोलताना म्हणाले की, लवकरात लवकर शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, जिथे मागणी आहे तिथे रोहित्र उपलब्ध करून द्यावीत, उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले की, महावितरणने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. यावेळी मागण्यांचे निवेदन जाधव, चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी चंद्रकांत पिसे, संतोष जगताप, आनंद पळसे, अविनाश मोहिते, श्रीपती दोरगे, सर्जेराव म्हस्के, शामराव शेंडगे, सदाभाऊ लकडे, डॉ-कांबळे, राजाभाऊ कुलकर्णी, सागर मसुडगे, केडगांव स्वप्नील भुजबळ, मोहन गोडावळे, रमेश पायगुडे, निलेश मेमाणे, शुभम माळवे, प्रशांत खराडे, कृष्णा जाधव, स्वप्नील शेळके, निलेश नलावडे, फैज सय्यद, वैभव वैद्य यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.