औरंगाबाद । राज्यात सुरू झालेल्या वीज भारनियमनाचा सर्वात मोठा फटका औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीला बसला आहे. एकाच दिवसात तब्बल 100 कोटींचा फटका बसल्याने उद्योजक संतप्त झाले असून ‘उद्योगांना भारनियमन नको’ अशी मागणी केली जात आहे. मंगळवारी केलेल्या अघोषित भारनियमनाने 450 लहान मोठ्या उद्योगांना थेट नुकसान झाले आहे. चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत 450 लहान मोठे उद्योग असून त्यात जवळपास 30 ते 32 हजार कर्मचारी काम करतात. मंगळवारी अचानकपणे सकाळी आणि दुपारी असे 2 वेळा भारनियमन केले गेले. अनेक ठिकाणी नित्यनियमाने सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अनेक उद्योजकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे महावितरण विरोधात उद्योजक संतप्त झाले. भारनियमन करताना कुठलीही सूचना नसल्याने कारखान्यात सुरू असलेली धडधड अचानक बंद झाली.
वीज नसल्याने कामगार बसून; दोन वेळा भारनियमन
चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत बहुतांश उद्योग 2 शिफ्टमध्ये चालतात. त्यामुळे 12 तासांमध्ये 8 तास वीज गेल्याने काम होऊ शकले नाही. अनेक कामगार येऊनही वीज नसल्याने ते बसून होते. त्यामुळे मंगळवारी एकाच दिवसात 100 कोटींचा शॉक उद्योजकांना बसला आहे. यात छोट्या उद्योगांना मोठा फटका बसला आहे. मंगळवारी केलेल्या अघोषित भारनियमनाने 450 लहान मोठ्या उद्योगांना थेट नुकसान झाले आहे. चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत 450 लहान मोठे उद्योग असून त्यात जवळपास 30 ते 32 हजार कर्मचारी काम करतात. मंगळवारी अचानकपणे सकाळी आणि दुपारी असे 2 वेळा भारनियमन केले गेले. अनेक ठिकाणी नित्यनियमाने सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अनेक उद्योजकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे महावितरण विरोधात उद्योजक संतप्त झाले. भारनियमन करताना कुठलीही सूचना नसल्याने कारखान्यात सुरू असलेली धडधड अचानक बंद झाली. चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत बहुतांश उद्योग 2 शिफ्ट मध्ये चालतात. त्यामुळे 12 तासांमध्ये 8 तास वीज गेल्याने काम होऊ शकले नाही. अनेक कामगार येऊनही वीज नसल्याने ते बसून होते. त्यामुळे मंगळवारी एकाच दिवसात 100 कोटींचा शॉक उद्योजकांना बसला आहे. यात छोट्या उद्योगांना मोठा फटका बसला आहे.
पावसामुळे उकाळा कमी
सलग दुसर्या दिवशी बुधवारी सायंकाळी पावसाने धुमाकूळ घालत काही काळासाठी शहराला ब्रेक लावला. पावसाचा जोर एवढा होता, की शहरातील नाल्यांना पूर आल्याने बारा वॉर्डांतील वसाहतींमध्ये पाणी शिरले. दोन दिवसांच्या पाण्यामुळे औरंगाबाद शहरात लाईट नसल्यामुळे त्याची कमतरता कमी अधिक जाणवत होती. दरम्यान, या पावसाने शहराची लाईफलाईन असलेला जालना रोडही तुंबला होता. पावणेदोन तासांत कोसळलेल्या या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत 50 मिमी एवढी नोंद झाली.पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या यंत्रणेची साफसफाई झालेली नसल्याने हे पाणी तुंबले असल्याने नागरिक चांगलेच संतापले होते. पाण्यामुळे नागरीकांची तारांबळ आणि छोटे मोठे उद्योगधंदे करणार्यांकडे संताप व्यक्त होत होता.