भारनियमनाविरोधात युवा सेनेतर्फे रावेरला निदर्शने

0

रावेर- भारनियमनाविरोधात शुक्रवारी युवा सेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुध्द जिल्हा अधिकारी अविनाश पाटील, तालुकाधिकारी प्रवीण पंडीत शहरप्रमुख राकेश घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सण-उत्सवाचे दिवस असल्याने वीज कंपनीतर्फे होणारे भारनियमन अन्यायकारक असल्याची भावना पदाधिकार्‍यांनी मांडली.

यांची होती उपस्थिती
कन्हैया गणवानी, योगेश धनके, जयवंत चौधरी, ईश्वर शर्मा, प्रशांत वारुदवाले, चेतन चौधरी, पंडित पाटील, प्रशांत पाटील, संदीप चौधरी, निखील महाजन, विनायक महाजन, दीपक महाजन, स्वप्नील पाटील, धनराज सोनवणे, नितीन चौधरी, गिरीश चौधरी, जयेश पाटील, विशाल शिंदे शिवसैनिक उपस्थित होते.