भारनियमन मुक्तीच्या घोषणेचे काय झाले?; सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

0

औरंगाबाद- आज राष्ट्रवादीचे बहुतांश नेते औरंगाबाद दौऱ्यावर आहे. खासदार सुप्रिया सुळे देखील या दौऱ्यात आहे. दरम्यान आज औरंगाबादमध्ये सकाळी ६.३० वाजेपासून वीज नव्हती. मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या औरंगाबादची ही अवस्था असेल तर खेड्यापाड्यात तर असे अघोषित भारनियमन सुरूच आहे. तुम्ही महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार होता त्याचे काय झाले असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला आहे.