भारिपतर्फे 15 रोजी धरणे आंदोलन

0
भुसावळ- भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्रभरातील आंबेडकरी तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, यासह अन्य पाच मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवार, 15 रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सहभागाचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष विनोद सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश इखारे, अरुण तायडे, महेश तायडे, गणेश इंगळे, प्रभाकर इंगळे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे.